Akola News: Ek Ghar Ek Pustak campaign to be implemented across the district 
अकोला

जिल्हाभरात राबविणार ‘एक घर एक पुस्तक’ अभियान

सकाळ वृत्तसेेवा

अकोट (जि.अकोला) : दरवर्षी दिवाळी मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात येते. परंतु या वेळेस कोरोना महामारीचेे संकट संपूर्ण जगभर कोसळलेले आहे. अद्यापही त्यावर लस निघाली नाही. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण उत्साहाचे वातावरण असते.

परंतु फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण,वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. पण आता फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल या उद्देशाने अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेने ‘एक घर एक पुस्तक’ अभियान संपूर्ण जिल्हाभरात १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचे ठरविले आहे.


युपीएससी, एमपीएससी, रेल्वे, नेट, सेट, बँक, पोलिस भरती यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रेरीत करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसह महापुरुषांची तसेच नामवंत लेखकांची पुस्तके, ग्रंथ, कादंबरी गोळा करण्यात येणार आहे.

जेणेकरून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प हा ‘एक घर एक पुस्तक’ या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल. या अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष ललित नगराळे यांच्यासह गोपाल गणोरकार, सुमेध डोंगरदिवे, देवांग सिरसाट, आदित्य नगराळे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT